भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधी-मंडेला क्रिकेट मालिका आयोजित करण्यात येणार आहे.
जोहान्सबर्ग – भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधी-मंडेला क्रिकेट मालिका आयोजित करण्यात येणार आहे. सध्या दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये या मालिकेचा कार्यक्रम निश्चित करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेचे प्रमुख हारुन लॉरगॅट यांनी संघासाठी नवा किट लॉंन्च करण्याच्या कार्यक्रमात माहिती दिली. गांधी-मंडेला मालिकेचा आम्ही प्रस्ताव मांडल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला.
या मालिकेतंर्गत आम्ही भारतात चार कसोटी सामने खेळणार आहोत आणि २०१८ मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेमध्ये चार कसोटी सामने खेळेल असे लॉरगॅट यांनी सांगितले.
सध्या दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केल्याचे लॉरगॅट यांनी सांगितले. लॉरगॅट यांनी लॉन्च केलेल्या किटमध्ये दक्षिण आफ्रिकन संघासाठी तयार केलेला खास गणवेश आहे. खेळाडूंना अधिक आराम मिळेल अशा पध्दतीने हा गणवेश तयार केला आहे. एकवेळ अशी होती की, आम्ही कुठलाही गणवेश परिधान करायचो पण आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य तयार केले जाते असे लॉरगॅट म्हणाले.