पाल्कसामुद्रधुनी जवळच्या नेडूनथीवू येथील समुद्रात मच्छीमारी करणा-या तामिळनाडूतील मंडापाम आणि रामेश्वरममधील २९ मच्छीमारांना श्रीलंकन नौदलाने अटक केली आहे.
रामेश्वरम – पाल्कसामुद्रधुनी जवळच्या नेडूनथीवू येथील समुद्रात मच्छीमारी करणा-या तामिळनाडूतील मंडापाम आणि रामेश्वरममधील २९ मच्छीमारांना श्रीलंकन नौदलाने अटक केली आहे.
सागरी हद्दीचे उल्लंघन आणि मच्छीमारीसाठी बंदी असलेले जाळे वापरल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन नौदलाने या मच्छीमारांच्या सात बोटी जप्त केल्या आहेत.
या मच्छीमारांना कंगेसंथुराई पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. यापूर्वी दहा फेब्रुवारीला कचाथीवूच्या समुद्रात मासेमारी करणा-या स्थानिक मच्छीमारांवर श्रीलंकन नौदलाने हल्ला केला होता.
या हल्ल्यात मच्छीमार जखमी झाले होते तसेच त्यांच्या बोटीचेही नुकसान झाले होते. मागच्या महिन्यात वेगवेगळया घटनांमध्ये श्रीलंकन नौदलाने ६९ मच्छीमारांना अटक केली आहे.