नवी दिल्ली – किंगफिशर एअरलाइन्सचा माजी अध्यक्ष, मद्यसम्राट आणि भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशी पलायन करणा-या विजय मल्या याने भारतीय कारागृहात नैसर्गिक प्रकाश आणि शुद्ध हवा नसल्याची तक्रार लंडनमधील न्यायालयात केली आहे. या
तक्रारीची नोंद घेत तेथील न्यायाधीश इम्मा अर्बउथनॉट ज्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत, त्यांनी भारताला आर्थर रॉड कारागृहाचा व्हीडिओ पाठवण्यास सांगितले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. करबुडवे प्रकरणी विजय मल्या यांच्यावर लंडन येथील वेस्टमिसन्टर दंडाधिकारी न्यायालयात खटला चालू आहे.