एका निषेध मोर्चादरम्यान भाजपा आमदार गणेश जोशी यांनी पोलीस दलातील ‘शक्तिमान’ या घोडाला क्रूरपणे मारहाण केली होती.
डेहराडून- एका निषेध मोर्चादरम्यान भाजपा आमदार गणेश जोशी यांनी पोलीस दलातील ‘शक्तिमान’ या घोडाला क्रूरपणे मारहाण केली होती. या मारहाणीत पाय गमवलेल्या ‘शक्तिमान’चा बुधवारी मृत्यू झाला. उत्तराखंड पोलीस आणि प्राणीप्रेमींनी त्याच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली आहे.
एका निषेध मोर्चामध्ये गणेश जोशी यांनी ‘शक्तिमान’ला काठीने क्रूरपणे मारहाण केली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या शक्तिमानला पाय गमवावा लागला होता.
शस्त्रक्रिया करून शक्तिमानला कृत्रिम पाय बसवला. या कृत्रिम पायावर तो उभा राहिला होता. मात्र बुधवारी त्याचा मृत्यू झाला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र बुधवारी त्याचा मृत्यू झाला.