नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून प्राथमिक निकालात दिल्लीकरांनी निवडणुकीत आम आदमी पक्षाला कौल दिल्याचे चित्र आहे.
नवी दिल्ली – नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून प्राथमिक निकालात दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला कौल दिल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेला भाजपाचा विजयरथ रोखण्यात ‘आप’ला दिल्लीत यश मिळाल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी आपल्या कृष्णनगर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत तर आपचे उमेदवार एस.के. बग्गा आघाडीवर आहेत.
दुस-या फेरीनंतर बेदी एक हजार ६५ मतांनी पिछाडीवर आहेत. यापूर्वी भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या या मतदारसंघातून वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाच वेळा निवडून आले होते.
२०१३ मधील निवडणुकीत हर्ष वर्धन या मतदारसंघातून ४३ हजार १५० मतांनी निवडून आले होते. वर्धन यांना ६९ हजार २२२ मते मिळाली होतीय. तर त्यांच्याविरोधात उभे राहिलेल्या काँग्रेसच्या विनोंद मोंगा यांना केवळ २६ हजार ७२ मते मिळाली होती.