भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांचा लग्नसोहळ्यानिमित्त बुधवारी जालंधर येथे मेहंदीचा कार्यक्रम झाला.
जालंधर- भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांचा लग्नसोहळ्यानिमित्त बुधवारी जालंधर येथे मेहंदीचा कार्यक्रम झाला. हा विवाह समारंभ पाच दिवस चालणार आहे.
जालंधरपासून २० किमी अंतरावर असलेल्या फगावाडा येथील हॉटेलमध्ये बुधवारी मेहंदीचा कार्यक्रम झाला. मेहंदीनिमित्त झालेल्या संगीत कार्यक्रमात भज्जीने तुफान बल्ले बल्ले केले. इतकेच नव्हे तर भज्जीने यासंदर्भातील काही फोटो त्याच्या फेसबूक पेजवरही शेअर केले आहेत.
हरभजनच्या घरचे वातावरण सध्या आनंदमयी आहे. विवाह सोहळ्यानिमित्त ब्रिटन, जर्मनी व फ्रान्स या तीन देशांमधील शेफ १५० प्रकारचे पदार्थ तयार करणार आहेत.
एक नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणा-या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज मान्यवर नेतेमंडळी आणि क्रिकेट व बॉलिवूडमधील सेलेब्रेटी उपस्थित राहणार आहेत.
गीता आणि भज्जी गेल्या तीन वर्षापासून डेटिंग करत होते. हरभजनने हातावर गीताचे नाव काढून घेतले आहे. त्यांच्या अफेअरविषयी अनेकदा तर्कवितर्क लढवण्यात आले आणि लग्नाची भाकितेही करण्यात आली होती.