महालक्ष्मीजवळ ब्रेक जाम झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
मुंबई- पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकात मंगळवारी सायंकाळी चर्चगेटहून बोरिवलीकडे जाणा-या उपनगरीय रेल्वेचे ब्रेक जाम झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
महालक्ष्मी स्थानकात मंगळवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी आलेल्या लोकलचे ब्रेक जाम झाल्याने गाडी जागीच थांबून राहिली. ब-याच प्रयत्नानंतर आठ वाजता ही गाडी सुरु झाली. पश्चिम रेल्वेच्या या तांत्रिक गोंधळामुळे प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली.
चर्चगेटच्या दिशेने लोकल रखडल्या होत्या. एकामागून एक गाड्यांची रांग लागल्याने कामावरुन घरी निघालेल्या प्रवाशांचे मात्र हाल झाले. पश्चिम रेल्वे मार्गावर काय झाले, लोकल का थांबल्या, याचा उलगडा न झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. दरम्यान, उपनगरीय गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.