अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लक्झरी गाड्या तसेच ब्रँडेड कपडे महागणार आहेत.
नवी दिल्ली- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लक्झरी गाड्या तसेच ब्रँडेड कपडे महागणार आहेत. तर आता सोन्याचे दागिने आणि हिरेही महागणार आहेत. त्यामुळे जेटलींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून फक्त महागाई झाली.
तंबाखूजन्य पदार्थ महागले असून अबकारी करात १० ते १५ टक्के वाढ करण्यात आल्याने विडी वगळता इतर तंबाखूजन्य पदार्थ महागले आहेत. सोन्यावरील आयाशुल्कारत वाढ करण्यात आली आहे.
डिझेल गाडयांवर अडीच टक्के तर पेट्रोल गाडयांवर एक टक्का सेस लावण्यात आला असून १० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाड्याही महागणार आहेत.
» तंबाखूवर दोन टक्के अधिक उत्पादनशुल्क
» तंबाखू, सिगारेट, विडी महाग होणार
» १० लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या गाड्या महाग होणार
» डिझेल मोटारींवर २.५ टक्के सेस लावणार
» सोने आणि हि-याचे दागिने महागणार