सोशल मिडीयावर आलिया भट्ट विनोदाचा विषय असली तरी, आजच्या घडीला आलिया बॉलिवूडमधील यशस्वी नायिका आहे.
सोशल मिडीयावर आलिया भट्ट विनोदाचा विषय असली तरी, आजच्या घडीला आलिया बॉलिवूडमधील यशस्वी नायिका आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर फक्त दोनवर्षात आलियाने यशस्वी नायिकांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
बॉलिवूडमध्ये इतक्या कमी वेळात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणा-या नायिका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असतील. त्यात आलियाचा समावेश होतो. २०१४ मध्ये आलियाने हायवे, २ स्टेटस आणि हमप्टी शर्मा की दुल्हनिया असे लागोपाठ तीन हिट चित्रपट दिले.
सोशल मिडीयावर आलिया भट्टच्या नावाने नेहमी वेगवेगळे विनोद फिरत असतात. पण ख-या आयुष्यात आलिया एक यशस्वी नायिका आहे. २०१२ मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा ती इतक्या कमी वेळात यशस्वी नायिका बनेल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र आज आपल्या कामातून आलियाने टिकाकारांना चोख उत्तर दिले आहे.
आलियाला याबद्दल विचारले असता ती म्हणाली की, लोक आज मला ओळखतात ही भावना मनाला सुखावून जाते. पण आजही मला न्यूकमर असल्यासारखे वाटते. आलियाच्या मानधनाच्या रक्कमेचा आकडा ही बदलला आहे. याबद्दल आलियाला विचारले असता ती म्हणाली की, हो पैसा महत्वाचा आहे.
पैसा महत्वाचा नाही असे मी म्हटले तरे ते खोटे बोलल्यासारखे असेल. आज मला बचत महत्वाची आहे. माझी अनेक स्वप्ने आहेत. त्यासाठी पैसा महत्वाचा आहे. मेहनतीने कमावलेला पैसा बेजबाबदारपणे खर्च करणे मला पटत नाही. आलियाने तिची मानधनाची रक्कम सांगितली नाही मात्र चित्रपटांच्या यशाबरोबर त्यात वाढ झाल्याचे तिने नाकारलेही नाही.