येथील उर्दू शाळेजवळ एक चौदा वषार्ची बेवारस मुलगी आढळून आली असून ती आपले नाव यास्मीन असे सांगत आहे. एका महिलेने दिलेल्या माहितीवरून नागोठणे पोलिसांनी तिला आपल्या ताब्यात घेतले आहे.
नागोठणे – येथील उर्दू शाळेजवळ एक चौदा वषार्ची बेवारस मुलगी आढळून आली असून ती आपले नाव यास्मीन असे सांगत आहे. एका महिलेने दिलेल्या माहितीवरून नागोठणे पोलिसांनी तिला आपल्या ताब्यात घेतले आहे. मुलीचे वय अंदाजे १४ आहे. उंची ४ फूट ८ इंच, रंग सावळा, उभट चेहरा, अंगाने मध्यम, अंगात निळ्या रंगाचा फुलाफुलांचा पंजाबी ड्रेस व आकाशी रंगाची ओढणी असे या बेवारस मुलीचे वर्णन आहे. यास्मीन नावाव्यतिरिक्त ती इतर कोणतीही माहिती स्पष्ट करीत नसल्याने सध्या तिची रवानगी पोयनाडच्या बालग्राम केंद्रात केली आहे. या मुलीबाबत कोणाला माहिती असल्यास नागोठणे पोलिसठाण्यात सहा. फौजदार किशोर मोरे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.