बीबीसीमध्ये होणा-या कर्मचारी कपातीच्या विरोधात कर्मचा-यांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे.
लंडन– बीबीसीमध्ये होणा-या कर्मचारी कपातीच्या विरोधात कर्मचा-यांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. यामुळे बीबीसीच्या रेडिओ आणि वृत्तवाहिनीच्या प्रसारण सेवेवर परिणाम झाला आहे.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टच्या सदस्यांनी सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून संप सुरु केला आहे. यामुळे बीबीसीची फाईव्ह लाईव्ह, ए एशियन नेटवर्क, रेडियोवरील न्यूज आणि वर्ल्ड सर्व्हिस हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान कर्मचा-यांच्या या संपावर बीबीसीच्या प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. गुणवत्तेशी तडजोड करत बीबीसी कर्मचा-यांची कपात करत असल्याचे नॅशनल युनियनच्या मुख्य सचिव मिशेल स्टेनिस्ट्रीट यांनी सांगितले.