आगामी बिहार विधानसभेची निवडणूक आपण लढवणार नसल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
पटना – आगामी बिहार विधानसभेची निवडणूक आपण लढवणार नसल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
मी बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार नसून, माझा पूर्णवेळ प्रचारासाठी देणार आहे असे नितीश कुमार यांनी सांगितले. बिहारमध्ये भाजपाला रोखण्यासाठी संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन आघाडी केली आहे.
नितीश कुमार या आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. मी निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करणार आहे असे नितीश म्हणाले. या वर्षाच्या शेवटाला बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे