बिग बॉसच्या घरात प्रवेश करणा-या नव्या स्पर्धकांबद्दलची उत्सुकता वाढली असून आपल्या सनसनाटी वागण्यामुळे नेहमी चर्चेत राहिलेल्या कल्लाकारांची संभावित यादी तयार झाली आहे.
मुंबई- बिग बॉसच्या घरात प्रवेश करणा-या नव्या स्पर्धकांबद्दलची उत्सुकता वाढली असून आपल्या सनसनाटी वागण्यामुळे नेहमी चर्चेत राहिलेल्या कल्लाकारांची संभावित यादी तयार झाली आहे.
बिग बॉसच्या ९ व्या पर्वाची सुरूवात लवकरच होणार असून सलमान खान पुन्हा एकदा या पर्वात सूत्रसंचालन करणार हे निश्चित झाले आहे. गेल्या वर्षी चित्रपटाच्या शूटींगमुळे त्याला बिग बॉसमधून मध्येच जावे लागले होते.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेली अध्यात्मिक गुरु राधे माँ लवकरच ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या ९व्या हंगामामध्ये झळकण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राधे माँ हिच्याकडे विचारणा करण्यात आल्याचे समजते. तीने मान्यता दिल्यास ‘बिग बॉस’मधील तीचे आगमन नक्की होईल.
परंतू काही कायदेशीर अडचणी तयार झाल्यामुळे राधे माँ बिग बॉसच्या घरात दिसणार की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.
बिग बॉसच्या घरात ‘सेक्स स्कँडल’मधील अभिनेत्री?
वादग्रस्त असणे हा जणू बिग बॉस या शोचे परिमानच समजले जाते. यात गेल्या वर्षी हैदराबादच्या उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसायात सहभागी असल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद हिचा समावेश करण्यात आला आहे. ‘मकडी’ या चित्रपटातील अभिनयासाठी २००२ मध्ये सर्वोत्त्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्वेता बसू प्रसाद हिला उच्चभ्रू वेश्या व्यवसायात सहभागी असल्याप्रकरणी हैदराबादमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिची चौकशी करुन तिला सुधारगृहात काही दिवसांसाठी पाठवण्यात आले होते. याशिवाय ‘इकबाल’ या चित्रपटात तसेच एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ या टीव्हीमालिकेत तिने भूमिका केली आहे.
बिग बॉसच्या घरात दिग्गज सेलेब्रेटी आणि वादग्रस्त व्यक्तींचाच भरणा केला जातो. पण जिच्यावर कोणताही आरोप नाही अशी सोज्वळ मुलगीही या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमातील शाहरुख खानच्या मुलगीची भूमिका केलेली सना सईद हा तिचा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर तिने हर दिल जो प्यार करेगा, बादल या सिनेमांमधूनही बालकलाकार म्हणून काम केले आहे. अशी ही सना सईद बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यास उत्सुक आहे.
इतर सदस्यांची संभावीत यादी तयार झाली असून त्यात राहुल यादव, रश्मी देसाई, आशा नेगी, व्हीजे बानी यांचा समावेश आहे.