बाळासाहेबांचा दरारा केवळ मुंबईपुरताच सीमित असल्याची टिकाही सातत्याने झाली. मात्र बाळासाहेबांच्या कर्तृत्वाची दखल सर्वात जास्त कोणी घेतली असेल तर ती दृकश्राव्य माध्यमाने आणि वृत्तपत्रजगताने.
मुंबई- ‘आवाज कोणाचा शिवसेनेचा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो..’ अशा घोषणा गेली ४० वर्षे महाराष्ट्राने ऐकल्या. पण बाळासाहेबांचा दरारा केवळ मुंबईपुरताच सीमित असल्याची टिकाही सातत्याने झाली. मात्र बाळासाहेबांच्या कर्तृत्वाची दखल सर्वात जास्त कोणी घेतली असेल तर ती दृकश्राव्य माध्यमाने आणि वृत्तपत्रजगताने. कुठल्याही वर्तमानपत्राला बाळासाहेबांचा एखादाही विचार, एखादीही टीका, एखादीही कृती ‘बातमी’ देऊन जायचाय अगदी स्थानिक वृत्तवाहिनीपासून बीबीसी न्यूज, सीएनएन, आयबीएनपर्यंत सर्वानाच बाळासाहेब यांच्या वक्तृत्वाने आकर्षित केले होते.
त्यांच्या अखेरच्या आजारपणातही मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि परदेशातील सर्व वाहिन्यांनी ‘मातोश्री’समोर ठिय्या दिला होता. बाळासाहेब लवकरच दर्शन देतील, असा प्रत्येक शिवसैनिकाला विश्वास होता. त्यासाठी सर्वत्र पूजा, होम हवन, आरती, प्रार्थना करण्यात येत होती. मात्र बाळासाहेबांचे देहावसान झाले आणि शिवसैनिकांसह मराठी माणसाने हंबरडा फोडला.
मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजरातीसह सर्व भाषांमधील वृत्तपत्रांनी अणि वृत्तवाहिन्यांनी, वृत्तपत्रांच्या संकतस्थळांनी या झंझावाती पर्वाची आवर्जून नोंद घेतली आहे. भारतासह पाकिस्तान, नेपाळ, अमेरिका या देशांच्या वर्तमानपत्रांच्या अधिकृत संकेतस्थळांवर बाळासाहेबांच्या आजारपणाची व निधनाची ठळक नोंद घेण्यात आली. पाकिस्तानच्या डॉन डॉट कॉमवर ‘भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व हिंदुत्वाचा कट्टर प्रसारक असणा-या बाळ केशव ठाकरे यांचे निधन’ झाल्याची बातमी त्वरीत प्रसिद्ध झाली. आखाती देशातील अल-जजिरा या वृत्तवाहिनीनेही बाळासाहेबांच्या निधनाची बातमी दिली. बीबीसी, सीएनएन, रॉयटर्स आंतरराष्ट्रीय वाहिनीनेही हे वृत्त प्रसारित केले.
बाळासाहेबांचे आपल्या प्रारंभीच्या पत्रकारितेच्या आणि व्यंगचित्रकारितेच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विल्फ्रेड चर्चिलच्या स्टाईलचा पगडा होता. चर्चिलच्या चरित्रातही बाळासाहेबांच्या व्यंगचित्राला मानाचे स्थान मिळाले आहे. चर्चिलची पाईप ओढण्याची शैली बाळासाहेबांनी नंतर चिरूट ओढताना आत्मसात केली. नुकतीच ‘टाइम नाऊ’ने घेतलेली बाळासाहेबांची मुलाखत गाजली होती. त्यात त्यांनी आपल्यावरील कोणाकोणाचा प्रभाव, शैली यांचा उहापोह केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाळासाहेबांचा वेध घेताना त्यांचे अंतरंग उलगडत जातात, नेहमीच्या ठाकरी स्टाईलमागील बाळासाहेबांचा वेगळा शोध लागतो.
[EPSB]
साहेब, तुम्ही हवे होता! »
मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी दूरचित्रवाणीवर पाहिली आणि मन हेलावून गेले. त्यां
बरं आता रजा घेतो…
बाळासाहेबांचे भाषण आणि गर्दी हे एक वेगळेच समीकरण होते. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… या वाक्यांनी सुरुवात होणारे त्यांचे भाषण उपस्थीत शिवसैनिकांमध्ये सळसळ निर्माण करत… बाळासाहेबांचे भाषण मग ते दस-या मेळाव्यातील असो की अन्य कोठेही शिवसैनिकांची लाखोंनी उपस्थीती असे…हीच गर्दी त्यांच्या अत्यंदर्शनासाठी पहायला मिळाली.
[/EPSB]