शिवाजी पार्क मैदानातील बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा रिकामी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शिवसेना नेत्यांना नोटीस पाठवली आहे.
मुंबई/ नवी दिल्ली- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या शिवाजी पार्क मैदानातील जागा रिकामी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि महापौर सुनील प्रभु यांना नोटीस पाठवली आहे.
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त दोन दिवसांसाठी हे मैदान शिवसेनेला देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही शिवसेनेने मैदानावरील अंत्यसंस्कारासाठी उभारलेला चौथरा काढला नाही. त्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच बाळासाहेबांच्या स्मारकावरून वाद घालू नका असे आवाहन केले आहे. मात्र आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे सांगत, ती जागा ऱिकामी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी नोटीस मिळाल्यानंतर उत्तर देणार असल्याचेही सांगितले. शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले, ती जागा शिवसैनिकांसाठी पवित्र स्थान आहे. तेथे एका श्रद्धेने लोक येत आहेत. त्यामुळे त्या जागेचे पावित्र्य राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तेथील चौथरा हटवला जाणार नाही, असे राऊत म्हणाले.
[EPSB]
अंत्यसंस्काराच्या जागेबाबत महापालिकेकडून कॅव्हेट
बाळासाहेबांच्या अंत्यविधीसाठी बांधण्यात आलेल्या चौथ-याला विरोध होत असून मुंबई महापालिकेने शहर दिवाणी न्यायालयासह उच्च न्यायालयातही कॅव्हेट दाखल केली आहे.
[/EPSB]