खडतर इंग्लंड दौ-याच्या तयारीसाठी आगमी बांगलादेश दौरा माझ्या दृष्टीने एका चांगली संधी आहे असे मत भारताचा हंगामी कर्णधार सुरेश रैनाने गुरुवारी व्यक्त केले.
मुंबई – खडतर इंग्लंड दौ-याच्या तयारीसाठी आगमी बांगलादेश दौरा माझ्या दृष्टीने एका चांगली संधी आहे असे मत भारताचा हंगामी कर्णधार सुरेश रैनाने गुरुवारी व्यक्त केले.
इंग्लंडमधल्या एकदिवसीय मालिकेपूर्वी बांगलादेशचा दौरा माझ्यासाठी एक चांगली संधी आहे. मी बांगलादेशमध्ये चांगली कामगिरी केली तर, इंग्लंडमध्ये जाऊनही मी चांगली कामगिरी करेन असे रैनाने म्हटले आहे. बांगलादेश दौ-यासाठी सुरेश रैनाकडे भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
बांगलादेश दौ-यात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारताच्या युवा संघासाठी बांगलादेश दौरा सोपा नाही याची रैनाला जाणीव आहे. घरच्या मैदानावर बांगलादेशचा संघ बलवान आहे असे रैनाने म्हटले आहे. महेंद्र सिंह ढोणी, विराट कोहली आणि रोहित शर्मा या स्टार क्रिकेटपटूंशिवाय भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. आगामी इंग्लंड दौरा लक्षात घेऊन या तिघांना बांगलादेश दौ-यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.