बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले असून त्यांना बांगलादेश दौ-यावर येण्याचे आमंत्रण दिले आहे.
ढाका- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले असून त्यांना बांगलादेश दौ-यावर येण्याचे आमंत्रण दिले आहे.
भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला निर्विवाद वर्चस्व मिळाले आहे. त्यामुळे देशाचा पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील. यामुळे शेख हसिना यांनी मोदींशी दुरध्वनीवरून संपर्क साधला आणि आगामी काळात दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली.