दिल्ली पोलिसांनी आपल्या अंगावर बस घालत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप आपचे प्रमुख दिलीप पांडे यांनी केला आहे.
नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी आपल्या अंगावर बस घालत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप दिल्लीतील आम आदमी पक्षाचे प्रमुख दिलीप पांडे यांनी केला आहे.
रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांकडून महिला कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी मी पोलीस ठाण्यात गेलो होतो.
यावेळी राजेंद्रनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर मी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतना दिल्ली पोलीसांनी त्यांची बस माझ्या अंगावर घालत मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी एका कार्यकर्त्याने मला बाजूला ढकलले त्यामुळेच मी वाचलो असे पांडे यांनी सांगितले.
याप्रकरणी पांडे यांनी रांजेद्रनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली आहे. आशा आहे की याप्रकऱणात ते एफआयआर दाखल करतील असे पांडे यावेळी म्हणाले.