दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी राम सिंगच्या घराजवळ बॉम्ब पेरणा-या एका ३७ वर्षीय इसमाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
नवी दिल्ली – दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी राम सिंगच्या घराजवळ बॉम्ब पेरणा-या एका ३७ वर्षीय इसमाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
राजेश असे या आरोपीचे नाव आहे. दक्षिण दिल्लीतील रवीदास कॉलनीतील राम सिंगच्या घराजवळ बॉम्ब पेरुन पळत असताना, स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांना रामसिंहच्या घराजवळ दोन बॉम्ब आढळून आले. हे बॉम्ब साधे आणि अत्यंत कमी तीव्रतेचे होते. फटाक्यांच्या दारुपासून हे बॉम्ब बनविण्यात आले होते. बॉम्ब पेरताना दोन साथीदारही राजेशसोबत होते.
परिसरातील नागरिकांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, नागरिकांनी त्यांना हटकले असता दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले तर, राजेशला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.