जगज्जेता विश्वनाथन आनंदला बिल्बाओ फायनल बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेच्या तिस-या फेरीतही बरोबरीवर समाधान मानावे लागले
साओ पावलो – जगज्जेता विश्वनाथन आनंदला बिल्बाओ फायनल बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेच्या तिस-या फेरीतही बरोबरीवर समाधान मानावे लागले. इटलीच्या फॅबियानो कॅरुआनाविरुद्ध त्याला गुण विभागून घ्यावे लागले. कॅरआनाविरुद्ध आनंदने बचावात्मक खेळावर अधिक भर दिला. कॅरुआनाने सर्वोत्तम फॉर्म कायम ठेवला तरी आनंदचा अभेद्य बचाव भेदणे त्याला जमले नाही.
तब्बल ७० चालींनंतर दोघांनी बरोबरी मान्य केली. तिसऱ्या फेरीतील अन्य डावही बरोबरीत सुटले. अर्मेनियाचा लेवॉन अॅरोनियन आणि स्पेनचा फ्रान्सिस्को वॅलेयो पॉन्स यांच्यातील लढत बरोबरीत राहिली. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनलाही रशियाच्या सर्जी कार्याकिनविरुद्ध बरोबरी मानण्याशिवाय पर्याय उरला नाही. एका क्षणी कार्लसन जिंकेल, अशी स्थिती होती.
मात्र कार्याकिनने प्रभावी चाली रचत पराभव टाळला. तिस-या फेरीतील सर्व डाव बरोबरीत सुटल्याने कॅरुआनाने सात गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. अॅरोनियन पाच गुणांसह दुस-या आणि आनंद तीन गुणांसह चौथ्या स्थानी आहे.