भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री बंगारू लक्ष्मण यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. पाठक यांनी गुरुवारी जामीन मंजूर केला.
नवी दिल्ली – लष्कराच्या साहित्य खरेदी व्यवहारात एक लाख रुपयांची लाच घेताना अटक केलेले भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री बंगारू लक्ष्मण यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. पाठक यांनी गुरुवारी जामीन मंजूर केला.
अकरा वर्षांपूर्वी तहलकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये लक्ष्मण यांना एका दलालाकडून एक लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश कंवलजीत अरोरा यांनी लक्ष्मण यांना लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवले. या प्रकरणी त्यांना चार वर्षांची शिक्षा झाली होती.
त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात जामिन मंजूर झाल्याने तिहार तुरुंगात असलेले लक्ष्मण यांची सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी मुक्तता करण्यात येणार आहे.