अल-कायदा या दहशतवादी संघटनेतील एका संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी बंगळूरू येथून अटक केली आहे.
नवी दिल्ली- अल-कायदा या दहशतवादी संघटनेतील एका संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी बंगळूरू येथून अटक केली आहे. मौलाना अंजर शाह असे या दहशतवाद्याचे नाव आहे.
मौलाना अंजर शाह हा बंगळूरुतील एका मदरशात शिक्षकाची नोकरी करत होता. भारतात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तो आखत होता. शाहला दिल्ली येथे आणले असून त्याला शुक्रवारी पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.