फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाइटचा वापर जर तुम्ही कार्यालयात केला तर तो भ्रष्टाचार ठरणार आहे.
कौलालंपूर- कार्यालयीन काळात सोशल नेटवर्किंग वेबसाइटचा वापर करणा-यांवर दंड ठोठावल्याची अथवा नोकरी गेल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. मात्र फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाइटचा वापर जर तुम्ही कार्यालयात केला तर तो भ्रष्टाचार ठरणार आहे.
सरकारी कर्मचा-यांनी कार्यालयात फेसबुकचा वापर केल्यास तो भ्रष्टाचार मानला जाइल असे मलेशियातील भ्रष्टाचार विरोधी आयोगाने(एमएसीसी) म्हटले आहे.
कार्यालयीन काळात कर्मचारी तब्बल तीन तास वैयक्तीक गोष्टीसाठी देत असतो. यामुळे सरकारच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. तसेच कर्मचा-यांना मिळणा-या मोबदल्याल ते पूर्ण न्याय देऊ शकत नसल्याचे एमएसीसीचे अध्यक्ष सुतां यांनी म्हटले आहे.
जर एखादा कर्मचारी कार्यालयात फेसबुक अथवा अन्य सोशल नेटवर्किंग वेबसाइट वापरताना आढळला तर त्याची नोकरी जाऊ शकते असा इशाराच सुतां यांनी दिला आहे. कर्मचा-यांनी जर या नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.