हँकॉक पुलाच्या पाडकामासाठी १८ तासांचा ब्लॉक घेतल्यानंतर हार्बर मार्गावरील बारा डब्यांच्या फलाटांच्या कामासाठी फेब्रुवारीत सलग ७२ तासांच्या विशेष ब्लॉकची चर्चा सध्या जोरात आहे.
मुंबई – हँकॉक पुलाच्या पाडकामासाठी १८ तासांचा ब्लॉक घेतल्यानंतर हार्बर मार्गावरील बारा डब्यांच्या फलाटांच्या कामासाठी फेब्रुवारीत सलग ७२ तासांच्या विशेष ब्लॉकची चर्चा सध्या जोरात आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) कडून यासाठी मध्य रेल्वेकडे विशेष ब्लॉकची मागणीही करण्यात आली आहे. मात्र रेल्वेतील काही अधिकारी यासाठी अनुकूल नसल्याने या ‘विशेष ब्लॉक’बाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
हार्बर मार्गावरील बारा डब्यांच्या फलाटांचे काम मागील अनेक वर्षे सुरू आहे. मात्र, वडाळा व सीएसटी स्थानकात अडचणी निर्माण झाल्याने हे काम मागील अनेक दिवसांपासून रखडले होते. त्यावर तोडगा निघाल्यानंतर ‘एमआरव्हीसी’कडून हे काम पूर्ण करण्यासाठी ‘विशेष ब्लॉक’ची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सीएसटी ते वडाळादरम्यान सलग ७२ तासांचा ब्लॉक घेण्याची मागणी ‘एमआरव्हीसी’ने मध्य रेल्वेकडे केली आहे.