फुटीरतावादी नेता शब्बीर शाह दिल्लीला पोहोचताच त्याला दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली – फुटीरतावादी नेता शब्बीर शाह दिल्लीला पोहोचताच त्याला दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आज सकाळी शब्बीर दिल्लीसाठी रवाना झाले होते. शब्बीर शहा येण्यापूर्वीच पोलिसांचे पथक दिल्ली विमानतळावर तैनात करण्यात आले होते.
पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताझ अझिझ यांच्याशी चर्चेसाठी काश्मीरी फुटीरतावादी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते. यासाठी शब्बीर दिल्लीत आले होते.
सकाळी ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास शब्बीर यांचे विमान विमानतळावर पोहोचले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. शब्बीर यांच्यासह आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
श्रीनगरहून दिल्लीला रवाना होताना शब्बीर म्हणाले होते, मी दिल्लीसाठी रवाना होत आहे. उद्या नवी दिल्लीत पाकिस्तान हाऊसमघ्ये रिसेप्शन आहे आणि तिथे आमची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताझ अझिझ यांच्याशी भेट होईल. ही चर्चा खूप महत्त्वपूर्ण आहे. आता आम्हाल भारतीय जनतेला असा प्रश्न विचारायचा आहे की भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी अथवा मनमोहन सिंग चुकीचे होते का? त्यांच्या कार्यकालात जेव्हा पाकिस्तानी नेते भारतात येत तेव्हा त्यांना भेटण्यापासून कधीच अडवण्यात आले नव्हते. काश्मीर हा महत्त्वाचा मुद्दा आहे.