मराठीतील पहिलाच सायन्स फिक्शन चित्रपट ‘फुंतरू’ ११ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके असून त्यांचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री केतकी माटेगावकर तर बालक पालक चित्रपटातील अभिनेता मदन देवधर प्रमुख भूमिकेत आहे.