![Narendra Modi molution](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/08/Narendra-Modi-molution.jpg)
नवी दिल्ली- मुलींमध्ये कमनीय बांध्यासाठीची अतिजागरूकता आणि शाकाहार हेच गुजरातमधील कुपोषणाचे कारण असल्याचा अजब दावा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
‘दी वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, मध्यमवर्गीय मुली आरोग्याप्रती कमी व सौंदर्याप्रती जागरूक असतात. राज्यात तीन वर्षाखालील 41 टक्के मुले वजनाने कमी असण्याचे हे प्रमुख कारण आहे.