मनोरंजन क्षेत्रातून सामाजिक कार्य करणा-या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव उंचावले असून नुकताच तिला वेराईटीचा पॉवर ऑफ वूमन पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रियांकासोबतच केली कार्लसन, पैटी जेनकीन्स, मिशेल फिफर, ओक्टाविआ स्पैसर आदी महिलांचा समावेश आहे. प्रियांका यूनिसेफची सदभावना दूत म्हणून कार्यरत आहे. विविध देशांतील शरणार्थीकरता तिचे काम एंजलिना जोलीप्रमाणेच दखलपात्र ठरले आहे.
याशिवाय जगभरात अनेक सुविधा, शिक्षण, निवारा आदींपासून वंचित असणा-या बालकांकरता निधी जमा करण्याचे प्रियांकाचे कार्य या पुरस्काराकरिता दखलपात्र ठरेल, याकरता तिने सीरिया, जॉर्डन इतथेही भेटी दिल्या आहेत. वेराईटीचे प्रमुख मिशेल सोब्रिनो म्हणाल्या, यंदा मनोरंजन क्षेत्रातील प्रभावशाली सामाजिक कार्य करणा-या महिलांचा गौरव करण्यात येतो आहे, ज्यात प्रियांकाची वर्णी लागली आहे. वेराईटीच्या ऑक्टोबरच्या अंकात या सर्वाच्या कर्तबगारीच्या स्टोरी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.