नवचिंतन सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार यंदा ‘प्रहार’ दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे.
मुंबई- नवचिंतन सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक संस्थेतर्फे देण्यात येणारा विनोद गुप्ता स्मृती पत्रकार रत्न पुरस्कार यंदा ‘प्रहार’ दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे. येत्या शुक्रवारी, २१ डिसेंबर रोजी कांदिवलीच्या महिला आधार भवन येथे सायंकाळी पाच वाजता होणा-या या कार्यक्रमात ‘प्रहार’चे संपादक महेश म्हात्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान देणा-या व्यक्तिंना हा पुरस्कार देण्यात येतो. यात दै. गावकरीचे प्रभाकर सुर्यवंशी, पुण्यनगरीचे अमित भोसले यांना मराठी पत्रकारितेसाठी तर हिंदी पत्रकारितेसाठी आनंद पांडे, नयन विशे आणि ज्ञानेश्वर ठोंबरे यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील काही व्यक्तिंना गौरवण्यात येणार असून यावेळी खासदार आनंदराव अडसुळ, आमदार गोपाळ शेट्टी, उपमहापौर मोहन मिठबावकर, नगरसेविका संध्या दोषी, अॅड. सुबोध पाठक आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर ज्येष्ठ पत्रकार अश्विनीकुमार मिश्र कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील असे संस्थेचे अध्यक्ष ईश्वर हैद्राबादी यांनी सांगितले.