ग्लोबल व्हिजन-कॅन्सर केअर या आरोग्य क्षेत्रात काम करणा-या संस्थेतर्फे गुरुवारी ‘प्रहार’ कार्यालयात ‘कॅन्सर जनजागृती’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई – ग्लोबल व्हिजन-कॅन्सर केअर या आरोग्य क्षेत्रात काम करणा-या संस्थेतर्फे गुरुवारी ‘प्रहार’ कार्यालयात ‘कॅन्सर जनजागृती’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रहार कार्यालयातील कर्मचा-यांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
ग्लोबल व्हिजन-कॅन्सर केअर ही संस्था मागील पाच वर्षे देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागात ‘कॅन्सरविषयी जनजागृती’चे काम करत असून, या संस्थेतर्फे गरजू कॅन्सर रुग्णांना मार्गदर्शन करण्यासोबतच आवश्यक ती
मदत करण्यात येते. याच कार्याचा भाग म्हणून गुरुवारी ‘प्रहार’ कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात हिमोग्लोबीन तपासणी, स्थूलता तपासणी,
बॉडी फॅट, विसेरल फॅट आणि बीएमआय आदी प्रमाणे, सीव्हीएस परीक्षण, श्वसन तपासणी, ईएनटी तपासणी, स्त्रीरोग तपासणी इत्यादी चाचण्या करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.