रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इस्त्रो-रेल्वे एकत्रितपणे काम करणार आहेत. त्यामुळे रेल्वे अपघाताचे प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकेल.
नवी दिल्ली – रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इस्त्रो-रेल्वे एकत्रितपणे काम करणार आहेत. त्यामुळे रेल्वे अपघाताचे प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकेल. तसेच पेपरलेस तिकीट प्रणाली देशभरात विकसित करण्यासाठी इस्रेच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
संपूर्ण रेल्वेमार्गाचा भौगोलिक नकाशा तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या इमारती, जमीन, कार्यशाळा आदी मालमत्तांचे अत्याधुनिक यंत्रणेने (जीआयएस) नकाशा बनवला जाईल.
इस्त्रोने तयार केलेल्या ‘गगन’ या दिशादर्शक यंत्रणेचे सहाय्य रेल्वे घेणार आहे. उपग्रहाच्या सहाय्याने रेल्वेच्या मालमत्तांचा नकाशा बनवण्यात मदत मिळेल. तसेच रेल्वे गाडय़ांमध्ये ‘वाय-फाय’ सेवा पुरवण्यास मदत मिळेल, असे रेल्वे अधिका-याने सांगितले.
या तंत्रज्ञानाने रेल्वेचे नेमके स्थान आणि भौगोलिक स्थान कळणार आहे. मानवरहित फाटकांच्या समस्येवर रिमोट सेन्सिंगच्या सहाय्याने तोडगा काढता येईल. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रस्त्यावरून वाहतूक करणा-या गाडय़ांना पूर्वसूचना मिळू शकेल.