भाजप खासदार प्रकाश जावडेकर आणि भूपेंद्रसिंह यादव यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
नवी दिल्ली – तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणात भाजप खासदार प्रकाश जावडेकर आणि भूपेंद्रसिंह यादव यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
याचिकाकर्त्याने दोघांवर तुलसीराम प्रजापती चकमक प्रकरणाच्या तपासात अडथळे निर्माण केल्याचा आरोप केला होता. न्यायमूर्ती बी.एस.चौहान यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्ते पुष्पकुमार शर्मा यांच्या हेतूबद्दल प्रश्न उपस्थित केला. पुष्पकुमार शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशन केले होते. जावडेकर आणि भूपेंद्रसिंह यादव प्रजापती प्रकरणाच्या तपासात अडथळे आणत असल्याची चित्रफीत असल्याचा त्यांनी दावा केला होता.
प्रजापती चकमक प्रकरणात भाजप नेते अमित शहा यांना वाचवण्यासाठी तपासात अडथळे आणले जात आहेत असा त्यांनी आरोप केला. न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालयात याचिका दाखल करणाचे निर्देश दिले.