निवडणुकीच्या कोणत्याही कामात किंवा प्रचारात लहान मुलांचा सहभाग दिसून आल्यास संबंधित राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने मंगळवारी उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.
मुंबई– निवडणुकीच्या कोणत्याही कामात किंवा प्रचारात लहान मुलांचा सहभाग दिसून आल्यास संबंधित राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने मंगळवारी उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.
प्रचारात लहान मुलांचा सहभाग न करण्याबाबतची याचिका न्यायाधीश अभय ओक यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आहे. राजकीय पक्षाची नोंद रद्द करणार नाही, मात्र कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्या पक्षाचे चिन्ह गोठवण्यास निवडणूक आयोगाला अधिकार असल्याचे निवडणूक आयोगाने मंगळवारी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
प्रचाराच्या कामात लहान मुलांच्या सहभागाबाबत निवडणूक आयोगाने मे २०१३ आणि सप्टेंबर २०१४ मध्ये सर्व राजकीय पक्षांना नोटिस बजावली होती. मात्र, राजकीय पक्षांवर कारवाई करण्यास निवडणूक आयोग प्रयत्नशील असले तरी अपक्ष म्हणून असणारे उमेदवार लहान मुलांचा वापर करत असल्यास त्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारला आहे.
3
यासंबंधात उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाला न्यायालयाने दोन आठवडय़ांची मुदतवाढ दिली आहे. दोन आठवडयांनंतर याचिकेची अंतिम सुनावणी होणार आहे.