मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याची प्रकृती गुरुवारी खालावली.
नवी दिल्ली- मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याची प्रकृती गुरुवारी खालावली. त्याला उपचारासाठी विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्याचा रक्तदाबही कमी झाला आहे.
उपोषणामुळे त्याचे वजन घटले असून अशक्तपणा आला आहे. त्यामुळे शारीरिक तक्रारी सुरू झाल्याचे संघटनेचा सरचिटणीस रामा नागा याने सांगितले.
९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी चौकशी करणा-या उच्चस्तरीय चौकशी समितीने कन्हैया, उमर खालिद यांच्यासह अन्य १८ विद्यार्थ्यांना दोषी ठरवले आहे. याच्या निषेधार्थ कन्हैयाने उपोषण सुरू केले आहे.