पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोग समितीकडून महाराष्ट्रातील चार लोकसभा उमेदवारांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
मुंबई – पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोग समितीकडून महाराष्ट्रातील चार लोकसभा उमेदवारांवर ठपका ठेवण्यात आला आहे. पेड न्यूज प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या समितीकडून या प्रकरणांतील ८४ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
ठपका ठेवण्यात आलेल्या या चार उमेदवारांमध्ये दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा, उत्तर मुंबईतील संजय निरुपम, पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम आणि पुण्यामधील भाजपचे उमेदवार दीपक शिरोळे यांचा समावेश आहे.
पेड न्यूज प्रकरणाबाबत हे चारही उमेदवार निवडणूक आयोगात अपील करु शकतात अथवा पेड न्यूज तसेच निवडणुकीत जाहिरातींसाठी झालेला खर्च याची माहिती देऊ शकतात, असे समितीचे सदस्य जतिन देसाई म्हणाले.
आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग करण्याच्या ८०१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी ७५ प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक अधिका-यांनी दिली.