पॅनकार्ड मिळवण्यासाठी आता आधारकार्ड हे अधिकृत ओळखपत्र म्हणून वापरता येणार आहे.
नवी दिल्ली – पॅनकार्ड मिळवण्यासाठी आता आधारकार्ड हे अधिकृत ओळखपत्र म्हणून वापरता येणार आहे. आधारकार्डावर असलेल्या माहितीचा उपयोग पॅनकार्ड मिळवण्यासाठी करण्यात यावा यासाठी अर्थमंत्रालयाला युआडीने एक अर्ज दाखल केला आहे. त्यावर नियमावली तयार करण्यात येत असून लवकरच पॅनकार्ड मिळवण्यासाठी आधारकार्ड हे अधिकृतपणे वापरता येणार आहे. यामुळे बनावट पॅनकार्डला आळा बसणार आहे. पॅनकार्डासाठी आधार कार्डाचा वापर सुरु झाल्यास आयकर खात्याला बनावट पॅनकार्ड शोधून काढण्यास मदत होणार आहे. कारण यातील बायोमॅट्रीक पद्धतीमुळे चोर पकडण्यास मदत होणार आहे.
अर्थमंत्रालयाने आयकर खात्याच्या मदतीने अंदाजे गेल्या तीन वर्षांत १.७५ लाखांहून अधिक आधार क्रमांक करदात्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती अर्थखात्याच्या अधिका-यांनी दिली.
आत्तापर्यंत अधिकृत ओळखपत्र म्हणून मतदानाचे ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना,पॅन कार्डाचा वापर केला जात होता.त्यात आता आधारकार्डाचाही समावेश करण्यात आला आहे.
अर्थमंत्रालयाने गेल्या वर्षी ४९ ए हा नवीन पॅनकार्ड फॉर्म जारी केला आहे. या फॉर्ममध्ये अर्जदाराला आधारकार्डाचा नंबर असणे सक्तीचे केले आहे.आतापर्यंत देशभरात १६.४९ कोटी अर्जदारांना पॅनकार्ड देण्यात आले आहेत.