जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.
पुलवामा जिल्ह्यातील चाँदगम भागात लष्कर ए तैयब्बा या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी गावात लपल्याची माहिती भारतीय सुरक्षा रक्षकांना मिळाल्याने शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने प्रत्युत्तरादाखल सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. अद्याप दुसरा दहशतवादी सापडला नसून येथे चकमक चालू आहे.