जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेसाठी पीडीपीसोबत युती करण्यास काँग्रेस पक्षाने तयारी दर्शवली आहे.
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेसाठी पीडीपीसोबत युती करण्यास काँग्रेस पक्षाने तयारी दर्शवली आहे.
सत्तास्थापनेसाठी भाजपऐवजी काँग्रेसशी युती करणे फायद्याचे असल्याचे मत पीडीपीचे नेते आणि खासदार मुझफ्फर हुसैन बेग यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर काँग्रेसनेही सत्तेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. निवडणुकीच्या मतमोजणीत सध्या पीडीपी आघाडीवर आहे. तर भाजप दुस-या क्रमांकावर आहे.
आम्ही युती कऱण्यास तयार आहोत. याआधीही आम्ही पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केली होती. एक गोष्ट स्पष्ट आहे की आम्ही भाजपसोबत जाणार नाही. कोणासोबत युती करायची हा त्यांचा निर्णय आहे मात्र आम्ही युतीसाठी तयार आहोत असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.