कुठल्याही भविष्य निर्वाहनिधीच्या व्यवहारासाठी आधार कार्ड जमा करणे सक्तीचे नसल्याचे स्पष्टीकरण सोमवारी सरकारने दिले.
नवी दिल्ली- कुठल्याही भविष्य निर्वाहनिधीच्या व्यवहारासाठी आधार कार्ड जमा करणे सक्तीचे नसल्याचे स्पष्टीकरण सोमवारी सरकारने दिले. कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचा-यांना पीएफसाठी अशा प्रकारची कोणतेच बंधन घातलेले नाही, असे श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी लोकसभेत सांगितले.
निवासी भारतीयांना आधार कार्ड इश्यू केले जात आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)कडून नोंदणीसाठी मल्टि-रजिस्ट्रेट्रार मॉडेल राबवले जात असल्याचे दत्तात्रय यांनी सांगितले. यामध्ये बँकांसह अनेक बिगर सरकारी संस्थांची नोंदणीसाठी रजिट्रार म्हणून नेमणूक केली आहे.