पिंपरी येथील भाटनगरमध्ये सोमवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीत टोळक्यांनी परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
पुणे- पिंपरी येथील भाटनगरमध्ये सोमवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीत टोळक्यांनी परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
यावेळी एकमेकांच्या घरांवर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
पिंपरीत भाटनगर येथे दोन गुंडांमध्ये वाद होउन जबर हाणामारी झाली. नंतर या टोळक्यांनी एकमेकांच्या घरांवर व आवारातील वाहनांवर दगडफेक केली. यात काही लोक जखमी झाले असून सुमारे १५ ते २० गाडयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिसरात तनावपुर्ण शांतता आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.