स्काईप, व्हॉट्सअॅप आणि वेबर या मेसेजिंग अॅपचा वापर दहशतवाद्यांकडून होत असल्याने पाकिस्तान सरकारने या सेवांचा वापर करण्यावर बंदी घातली आहे.
कराची- स्काईप, व्हॉट्सअॅप आणि वेबर या मेसेजिंग अॅपचा वापर दहशतवाद्यांकडून होत असल्याने पाकिस्तान सरकारने या सेवांचा वापर करण्यावर बंदी घातली आहे.
सिंध प्रांताचे मुख्यमंत्री अली शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या मेसेजिंग अॅपच्या सहाय्याने दहशतवादी सहजपणे संवादकरत असल्याचे कारवाई दरम्यान आढळून आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.