पाकिस्तानच्या केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुका अकरा मे रोजी होणार असल्याची घोषणा अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी जाहीर केले.
इस्लामाबाद- पाकिस्तानच्या केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुका अकरा मे रोजी होणार असल्याची घोषणा अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी जाहीर केले. पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांनी अध्यक्षांना निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची विनंती केल्यानंतर झरदारींनी ही घोषणा केली.
पाकिस्तानच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहाने रविवारी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत निवडणुका घेणे बंधन कारक आहे.
देशातील राजकीय अस्थिरता, दहशतवादी हल्ला अशा परिस्थीतीतही पाकिस्तान सरकारने पाच वर्ष पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर सरकार विसर्जित न होण्याची ही पहिलीच वेळ आहे.