अट्टल गुन्हेगारांच्या यादीत भारताला हवा असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा कराचीत दडून बसल्याचे भक्कम पुरावे भारताच्या हाती लागल्यानंतर पाकिस्तानने त्याचा ठावठिकाणा बदलला आहे.
नवी दिली – अट्टल गुन्हेगारांच्या यादीत भारताला हवा असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा कराचीत दडून बसल्याचे भक्कम पुरावे भारताच्या हाती लागल्यानंतर पाकिस्तानने त्याचा ठावठिकाणा बदलला आहे.
दाऊद भारताच्या हाती लागू नये, यासाठी पाकिस्तानमधील गुप्तहेर संस्था आयएसआयने त्याला उत्तर पाकिस्तानातील मुरी येथे हलवल्याचे वृत्त आहे. दाऊद हा पत्नी मेहजबीन व मुलांसह कराचीत तळ ठोकून असल्याचे पुरावे भारताच्या हाती लागले होते.
दाऊदसोबत त्याची पत्नी, धाकटी मुलगी व लहान भाऊ अनिसलाही आयएसआयने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.