अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात रविवारी पाकिस्तानी लष्कराने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात सुमारे २१ संशयित दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराने दिली.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2014/05/Indian-Consulate-in-Herat.jpg)
इस्लामाबाद – अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात रविवारी पाकिस्तानी लष्कराने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात सुमारे २१ संशयित दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराने दिली.
खैबर भागातील दहशतवाद्यांच्या तीन तळांवर लष्कराने हवाई हल्ले चढवले. यामध्ये दहा दहशतवादी ठार झाले तर उत्तर वझारिस्तान भागातील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या हल्ल्यात ११ दहशतवादी ठार झाल्याचे लष्कराने सांगितले.
याआधी जून महिन्यात पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या ‘झरब-ए-अझब’ या कारवाईत आतापर्यंत सुमारे एक हजार १०० दहशवाद्यांना कंठस्नान घातले आहे.