पश्चिमबंगालच्या राजकारणामध्ये तृणमूल काँग्रेसची विजयी घौडदौड कायम आहे.
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये पुढल्यावर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीपूर्वी आत्मविश्वास उंचावणारे घवघवीत यश तृणमुल काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळाले आहे.
मंगळवारी जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालावरुन पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले आहे.
प्रतिष्ठेच्या कोलकाता महानगर पालिकेच्या निवडणुकीत तृणमुल काँग्रेसने एकहाती विजय संपादन केला आहे. तृणमुलने १४४ जागांपैकी ११४ जागा जिंकल्या आहेत तसेच ९१ स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी ६९ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तृणमुलची सत्ता येणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपाने या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावला होता. मात्र मतदारांनी भाजपाकडे दुर्लक्ष करत ममतादीदींवर विश्वास दाखवला आहे.