फिफा वर्ल्डकपमधील उपांत्यफेरीत जर्मनीकडून मानहानीकारक पराभव झाल्याने ब्राझील संघाचा कर्णधार डेविड लुईझ याने देशाची माफी मागितली.
बेलो होरिझोंटे – फिफा वर्ल्डकपमधील उपांत्यफेरीत जर्मनीकडून मानहानीकारक पराभव झाल्याने ब्राझील संघाचा कर्णधार डेविड लुईझ याने देशाची माफी मागितली.
मी सर्वांची माफी मागतो. सर्व देशवासीयांची मी माफी मागतो. मला फक्त माझ्या लोकांच्या चेह-यावर आनंद पाहायचा होता. देशवासीयांच्या चेह-यावर आनंद आणणे कसे गरजेचे हे आम्हाला माहित होते. जर्मनीचा खेळ चांगला झाला. त्यांची तयारी खूप चांगली होती. हा खरच दुखाचा दिवस आहे. यातून नक्कीच शिकण्यासारखे आहे, असे लुईझ यावेळी म्हणाला.
जर्मनीविरुद्धच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात ब्राझीलला ७-१ ने पराभव पत्करावा लागला. आतापर्यंतचा ब्राझीलचा हा सर्वात मोठा पराभव आहे. आपल्याच भूमीत पराभव झाल्याने संपूर्ण ब्राझीलवासिय शोकसागरात बुडाले आहेत.