लातूरमधील पुष्कराज ट्रव्हल्सचे संचालक युवराज पनाळे यांची प्रॉपर्टीच्या कारणावरून मंगळवारी रात्री तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली.
लातूर – लातूरमधील पुष्कराज ट्रव्हल्सचे संचालक युवराज पनाळे यांची प्रॉपर्टीच्या कारणावरून मंगळवारी रात्री तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी बुधवारी पहाटे पोलिसांनी पाच जणांना अटक केली, तर अन्य दोघे फरार आहेत.
संतोष पनाळे, गणेश सगर, गोविंद कुटवाडे, व्यंकट कुटवाडे, कमलाकर बस्तापुरे अशी पाच जणांची नावे असून व्यंकट पनाळे व मधुकर बस्तापुरे हे दोघे फरार असल्याची माहिती शहर पोलिस उपाधीक्षक तिरुपती काकडे यांनी दिली. दरम्यान, बुधवारी दुपारी युवराज पनाळे यांच्या पार्थिवावर हरंगूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
युवराज पनाळे (४०) हे नेहमीप्रमाणे रात्री औसा रोडवरील पाटील प्लाझा येथील आपल्या कार्यालयातून गाडीने घरी जात होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते घराजवळ पोहोचले. गेट उघडण्यासाठी ते पुढे जात असताना ४ ते ५ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी पनाळे गेटपासून पुढे पळत सुटले. पण हल्लेखोरांनी पाठलाग करून तीक्ष्ण हत्याराने त्यांचा जागीच मृत्यू झाला.