Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeसंपादकीयअग्रलेखपडद्यामागचा क्रूरकर्मा

पडद्यामागचा क्रूरकर्मा

मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात जे पडद्यामागचे काही प्रमुख सूत्रधार होते त्यात डेव्हिड हेडलीचाही समावेश होता. त्याला ३५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा तर त्याचा साथीदार तहव्वूर राणाला १४ वर्षाची शिक्षा झाली आहे. या दोघांना अमेरिकेत अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतरच मुंबई हल्ल्याचे कटकारस्थान उघडकीला आले. मुंबई हल्ल्यात आपला हात नसल्याचा कांगावा करत असलेला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडा पडला. मात्र, मुंबई हल्ल्यापाठीमागचे अनेक सूत्रधार आज उजळ माथ्याने पाकिस्तानात फिरत आहेत. म्हणूनच पाकिस्तानने घडवून आणलेल्या या महाभयंकर अशा हत्याकांडातील प्रत्येक गुन्हेगाराला फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी भारताने केली आहे.

मुंबईवरील २००८मधील दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हिड हेडली याला या हल्ल्याबाबत अमेरिकन न्यायालयाने दोषी ठरवून ३५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतातील ठिकाणांची माहिती पुरवण्याचे काम हेडली याने केले होते. हेडली याच्या माहितीच्या आधारावरच मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊ शकला. अशा या मूळच्या पाकिस्तानी वंशाच्या हेडलीला झालेल्या शिक्षेने मुंबईकरांसह तमाम भारतीयांना काही अंशी तरी समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही. २६ नोव्हेंबर २००८ ला पाकिस्तानातील ‘लष्कर-ए-तोयबा’ ही दहशतवादी संघटना, पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि पाकची कुख्यात ‘आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या हल्ल्यात १६६ लोक ठार झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिस दलाचे तीन अधिकारीही हल्ल्यात शहीद झाले. सागरी मार्गाने ‘लष्कर-ए-तोयबा’चे १० दहशतवादी मुंबईत घुसले. आखलेल्या कटानुसार, या दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस व ताज हॉटेलसहित आठ ठिकाणांना लक्ष्य केले. हा दहशतवादी हल्ला पाकिस्तानच्या लष्करी अधिका-यांच्या व गुप्तहेर यंत्रणेच्या मदतीने आणि मार्गदर्शनाखाली झाला. भारताने याबाबतचे ठोस व सबळ पुरावेही पाकिस्तानला दिले आहेत. पण पाकिस्तानने या हल्ल्याशी आपला संबंध नाही, असे सांगून नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवले. परंतु या घातकी हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हिड हेडली या अमेरिकन नागरिकाला अमेरिकेने पकडल्यानंतर त्याने दिलेल्या कबुलीजबाबात पाकिस्तानला तोंडघशी पाडले. अमेरिकन न्यायालयाने ३५ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या या हेडलीची पूर्वपीठिका पाहिल्याशिवाय त्याचे प्रताप उघडकीला आले. या हेडलीच्या ‘डेडली’ कारवायांबाबत जगावर आपले वर्चस्व ठेवू पाहणारी अमेरिका कशी गाफील राहिली, हेही कळणार नाही. हेडली हा अमेरिकन नागरिकत्व मिळवून अमेरिकेत राहिलेल्या मूळ पाकिस्तानी नागरिकाचा मुलगा. त्याची आई अमेरिकन. १९६०मध्ये जन्म झालेल्या हेडलीचे मूळ नावही मुस्लीम होते. जन्मानंतर त्याचे नाव दाऊद ठेवण्यात आले होते. त्याच्या जन्मानंतर दाऊद आपल्या आईवडिलांसोबत पाकिस्तानात लाहोर येथे आला. तेथे वास्तव्यास असताना त्याने लष्करी शाळेत प्रवेश घेतला. तेथेच त्याची तहव्वूर राणा याच्याशी ओळख झाली व तेथूनच त्याचे दहशतवादाचे बाळकडू प्यायला सुरुवात झाली. ज्या तहव्वूर राणाला गेल्याच आठवडय़ात दहशतवादी कारवायांबद्दल न्यायालयाने शिक्षा दिली त्याच राणाने पुढे हेडलीला दहशतवादी कारवायांच्या क्षेत्रात ओढले. दाऊदच्या अमेरिकन आईने दाऊदच्या वडिलांशी घटस्फोट घेतल्यानंतर ती बरेच वष्रे अमेरिकेत राहत होती. पण काही वर्षानंतर ती पाकिस्तानला गेली व ती दाऊदला घेऊन अमेरिकेला परतली. दाऊद अमेरिकेत आला तरी त्याचे पाक आणि इस्लामविषयीचे प्रेम कमी झाले नव्हते. पाकमधील आपल्या लष्करी शाळेतील मित्रांशी संभाषण करताना आणि ई-मेलवर संदेशवहन करताना तो अमेरिकेविषयी संताप व्यक्त करत असे व भारताला क्रमांक एकचा शत्रू मानून भारताचा सूड घेण्याची भाषा नेहमी बोलत असे. दरम्यान, त्याच्या मानसिकतेमुळे त्याचा पाकमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याशी तसेच पाकिस्तान लष्कर व आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या वरिष्ठ अधिका-यांशी संबंध आला व त्याच्या दहशतवादी कारवायांना चालना मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या दहशतवादी कारवायांच्या सोयीसाठी मधल्या काळात या दाऊदने आपले मुस्लीम नाव बदलून डेव्हिड हेडली असे करण्यात सफाईदारपणे यश मिळवले. अशा रीतीने अमेरिकन नाव धारण केलेल्या व हेडली बनलेल्या दाऊदला दहशतवादी कारवाया करण्यास मोकळे रान मिळाले. हे नवे नाव धारण केलेल्या हेडलीने अमेरिकन पासपोर्ट मिळवून त्यानंतर पाकला वारंवार भेट देण्यास सुरुवात केली. या काळात हेडलीने पाकिस्तानातील दहशतवादाचे प्रशिक्षण देणा-या तळांना अनेकदा भेट दिली व पाकिस्तानी अधिका-यांशी भारतात दहशतवादी कृत्ये करण्याबाबत चर्चाही केली. यातूनच मुंबईवरील हल्ल्याचा कट शिजला. या हल्ल्यासाठी त्याला पाकच्या लष्करी व आयएसआयच्या वरिष्ठ अधिका-यांनी आवश्यक ती कागदपत्रे, मुंबईचे नकाशे व २५ हजार डॉलर दिले. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणांची टेहाळणी करून त्याबद्दलची माहिती त्याने तोयबाकडे पाठवली होती. तसेच भारतातील बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कातही हेडली होता. एवढेच नव्हे तर पुण्यात जर्मन बेकरीत जो बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाचीही हेडलीने पाहणी केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, एका डॅनिश वृत्तपत्राने महंमद पैगंबराचे व्यंगचित्र छापले म्हणून हेडलीने सूड घेण्यासाठी या वृत्तपत्रावर हल्ला करण्याचा कट आखला होता. परंतु अमेरिकन पोलिसांनी त्याला या कटाबद्दल अटक केली. ही अटक झाल्यानंतर झालेल्या चौकशीत त्याने आपल्या सहका-यांची माहिती सांगितली. यानंतर त्याचा सहकारी तहव्वूर राणा यालाही अटक करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पाकिस्तानने मुंबईवरील हल्ल्यात आपला काहीच हात नाही, असे सांगितले होते व पाकवरील आरोप साफ खोटे आहेत, असा कांगावा केला होता त्या पाकचा हात या हल्ल्यामागे होता, अशी कबुली हेडलीने आपल्या जबाबात दिली. हेडलीने या कबुलीजबाबात सांगितले की, पाक लष्करी व आयएसआयच्या अधिका-यांचा या हल्ल्यामागे हात असून सर्व प्रकारची मदत आणि मार्गदर्शन होते. हेडलीवर भारतावर दहशतवादी हल्ला केल्याचा अमेरिकेने आरोप ठेवल्यावर भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने अमेरिकेकडे हेडलीला भारताच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी केली. पण अमेरिकेने या मागणीला नकार दिला. मात्र भारतीय अधिका-यांना अमेरिकेत येऊन हेडलीची भेट घेण्यास व त्याची चौकशी करण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे भारतीय अधिका-यांनी हेडलीची भेट घेतली व चौकशी केली. आता हेडलीला ३५ वर्षाची शिक्षा झाली आहे. आपण आता सुधारलो आहोत, असे त्याने न्यायालयात सांगितले. पण न्यायाधीशांनी त्याच्या म्हणण्यावर विश्वास नसल्याचे सांगून हेडलीने चौकशीदरम्यान सहकार्य केल्याने त्याला केवळ तुरुंगवासाची शिक्षा देत असल्याचे सांगितले. वास्तविक हेडलीचे गुन्हे हे अमेरिकेच्या निष्काळजीपणाचे कडू फळ आहे. कारण तो अमेरिकन नागरिक असला तरी तो दुस-याच नावाने वावरत होता व भारत व अन्य देशांविरुद्ध कारवाया करत होता. पाकिस्तान व भारतात तो अनेक वेळा जात-येत होता व दहशतवाद्यांशी संबंध ठेवून होता. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे तो प्रथम अमली पदार्थाच्या तस्करीत होता व त्याला दोन वेळा शिक्षाही झाली होती. पण अमेरिकन ड्रग एन्फोर्समेन्टला सहकार्य करण्याच्या बोलीवर त्याची शिक्षा कमी झाली होती. एवढेच नव्हे तर त्याच्या वकिलाच्या विनंतीवरून त्याच्या सुटकेनंतर असणारे तीन वर्षाचे निर्बंधही काढून टाकण्यात आले होते. म्हणजे हा सगळा अमेरिकेचा हलगर्जीपणा आणि नाकत्रेपणा भारताला महाग पडला, असेच म्हणावे लागते. मुंबईवरील दहशतवादी हल्ला देशवासीय कधीच विसरू शकणार नाहीत. त्यामुळेच मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांना फाशीची शिक्षा द्यायला हवी, अशी मागणी भारताने केली आहे.

[EPSB]

आशादायी शिफारशी

Justice JS Verma committee submits report

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर महिलांविरोधातील कायद्यांचा पुनर्विचार केला जावा, यासाठी न्यायमूर्ती वर्मा समितीने केलेल्या शिफारशी खूपच आशादायी आहेत. मात्र, बलात्कार आणि खून करणा-यांनाही फाशी न देता जन्मठेप दिली जावी, अशी त्यांची शिफारस वादग्रस्त आहे. खून करणा-याला फाशी दिली जात असेल तर मग बलात्कार व खून करणा-यांना फाशी का दिली जाऊ नये? सध्याचे कायदे पुरेसे आहेत. […

[/EPSB]

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट