पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दूरध्वनी करुन विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दूरध्वनी करुन विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, दिल्लीमध्ये आपला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. तर भाजप आणि काँग्रेसचा पार धुव्वा उडाला आहे.
लोकशाही संकेतानुसार नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांना अभिनंदनाचा दूरध्वनी करुन एकप्रकारे पराभव मान्य केला. केंद्र सरकार दिल्लीच्या विकासात राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करेल, अशी हमीही मोदींनी यावेळी केजरीवालांना दिली.
Spoke to @ArvindKejriwal & congratulated him on the win. Assured him Centre’s complete support in the development of Delhi.
— Narendra Modi (@narendramodi)
February 10, 2015