इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी आता पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंगसह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.
नवी दिल्ली- इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी आता पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंगसह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केजरीवाल आणि त्यांच्या संस्थेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर केजरीवाल यांनी त्याला ट्टिवटरवरुन उत्तर दिले आहे.
इंडिया अगेन्स्ट करप्शन काँग्रेसच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल मात्र त्याआधी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अन्य सर्वांनी देशातील नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
रॉबट वढेरा आणि पंतप्रधान डॉ.सिंग यांना आम्ही काही प्रश्न विचारू मग त्यांनी उपस्थित केल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही तयार आहोत.